Thackeray and Shinde Group Symbol : ठाकरे आणि शिंदे गटाला नवी नावं, शिंदे गट चिन्हाच्या प्रतीक्षेत
केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिंदे गटाला कोणतं चिन्ह मिळणार याचा आज फैसला होणार आहे. शिंदे गटाला चिन्हासाठी आज तीन नवे पर्याय द्यावे लागणार आहेत. शिंदे गटाने दिलेले निवडणूक चिन्हांचे तीनही पर्याय आयोगाच्या मुक्त चिन्हांच्या यादीतील नसल्याचे निदर्शनास आणून दिलं. आज सकाळी 10 वाजेपर्यंत चिन्हाचे 3 नवे पर्याय सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिलेत. शिंदे गटाला आज कुठलं चिन्ह मिळणार याकडे नजरा लागल्यात.