Thackeray Alliance :MNS एकट्याने लढणार? युतीची चर्चा पुन्हा फिस्कटणार? Bala Nandgaonkar म्हणाले...

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. आतापर्यंत मनसेने निवडणुका एकट्याने लढवल्या आहेत आणि गरज पडल्यास यापुढेही एकट्याने लढण्याची तयारी असल्याचे त्यांनी सूचित केले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीबद्दल चर्चा सुरू असतानाच हे विधान समोर आले आहे. त्यामुळे राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीची चर्चा पुन्हा एकदा थांबणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. युती किंवा आघाडीचा विषय पक्षप्रमुखांच्या अखत्यारीत असल्याचे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले. यावर पक्षप्रमुखच भाष्य करू शकतात असेही ते म्हणाले. प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाची वाढ कशी होईल हे पाहत असतो. पक्षप्रमुख हे पक्षाच्या हितासाठी योग्य निर्णय घेतात. 'वेळ आली तर आपल्याला एकटयच आपण लढविण्याच्या भूमिकेमध्ये आहोत' असे नांदगावकर यांनी नमूद केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola