Tejasvee Ghosalkar PC : ठाकरेंना जय महाराष्ट्र, तेजस्वी घोसाळकरांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

Continues below advertisement

Tejasvee Ghosalkar Resignation मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर आज भाजपामध्ये पक्षप्रवेश (Tejasvee Ghosalkar Resignation) केला. आज दादरच्या वसंत स्मृतीमध्ये तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला. या पक्षप्रवेशाआधी तेजस्वी घोसाळकर (Tejasvee Ghosalkar) यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट करत वेदनेतून घेतलेला हा निर्णय आहे, प्रामाणिकतेशी तडजोड नाही. मुलांच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी वेगळा निर्णय घ्यावा लागतोय, असं मत व्यक्त केलं. 

कोण आहे तेजस्वी घोसाळकर? (Who Is Tejasvee Ghosalkar)

तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत. 2017 मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाग क्रमांक 1 मधून तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या होत्या. तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तर माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत. अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते. फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांचं वर्चस्व असलेल्या मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची वर्णी लागली, त्याचवेळी त्यांचा भाजपामध्ये प्रवेश होऊ शकतो अशी चर्चा सुरु झाली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola