Supriya Sule On Farmer : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेते मंडळींकडे वेळ नाही का? :सुप्रिया सुळे
Continues below advertisement
बारामतीत शेतकऱ्याने व्हिडीओ काढून आत्महत्या केलीये. पाटबंधारे विभाग, महावितरण विभाग आणि पोलिसांच्या जाचाला कंटाळून या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा आरोप केला जातोय. हनुमंत सणस असं या शेतकऱ्याचं नाव असून ते लाटे गावचे रहिवासी होते. पाटबंधारे विभाग, महावितरण विभाग आणि स्थानिक पोलिसांनी त्यांना कसा त्रास दिला याची आपबिती त्यांनी आत्महत्येपूर्वी व्हिडीओतून मांडलीये. या तिन्ही विभागाकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवल्याचा आरोप मयत शेतकऱ्याच्या कुटुंबाने केलाय... एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे.. प्रचारांचा सपाटा सुरु आहे.. मतांसाठी मतदारांपर्यंत पोहचणाऱ्या नेते मंडळींकडे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ नाही का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जातोय.
Continues below advertisement