
Supriya Sule on Wicket from cabinet| शंभर दिवसात एक विकेट, सहा महिने थांबा आणखी एक विकेट जाणार
‘बरे झाले पक्ष फुटला. जो आपली बायको आणि मुलींच्या गाडीत बंदूक ठेऊ शकतो, अशा फालतू माणसाबरोबरच काम करणे शक्य नाही,‘‘ अशा शब्दात धनंजय मुंडे यांचे नाव न घेता खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी जोरदार टीका केली. राज्यातील महायुतीच्या कारभारावर टीका करताना ‘ शंभर दिवसात एक विकेट गेली आहे. सहा महिने थांबा आणखी एक विकेट जाणार आहे,’ असा दावाही त्यांनी यावेळी केला.
हे देखील वाचा
Beed Crime: मुलीला विकाससोबत शेतात नको त्या अवस्थेत पाहिलं अन् वडील संतापले; बीडमधील ट्रकचालक तरुणाच्या हत्याप्रकरणाचं खरं कारण समोर
बीड: बीड जिल्ह्यात विकास बनसोडे या ट्रकचालक तरुणाची हत्या झाल्याची घटना नुकतीच समोर आली होती. या तरुणाला त्याच्या पूर्वीच्या मालकाने दोन दिवस पत्र्याच्या शेडमध्ये डांबून बेदम मारहाण केली होती. यामध्ये विकासचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी पोलिसांनी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाला सुरुवात केली होती. त्यावेळी या हत्येमागील (Beed Murder) खरे कारण समोर आले आहे. विकास अण्णा बनसोडे (वय 23) याचे ट्रकचा मालक असणाऱ्या भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. या कारणावरुन भाऊसाहेब क्षीरसागर यांनी विकासला कामावरुन काढूनही टाकले होते.
विकास बनसोडे हा आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील रहिवासी होता. गेल्या आठवड्यात विकास कड परिसरात आला होता. त्याचे भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. हे दोघेजण भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या घरामागे असलेल्या शेतात आक्षेपार्ह अवस्थेत दिसल्यानंतर मुलीचे वडील संतापले होते. त्यांनी नातेवाईकांसह विकास बनसोडे याला दोन दिवस एका पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवले. याठिकाणी दोरी आणि वायरच्या साहाय्याने विकास बनसोडे याला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीमुळे विकासचे संपूर्ण शरीर काळेनिळे पडले होते. या अमानुष मारहाणीत विकासचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यावर आरोपींनी त्याचा मृतदेह कड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन ठेवला आणि तिथून पळ काढला. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्याप्रमाणेच विकास बनसोडे याची निर्घृणपणे हत्या केल्याने खळबळ उडाली होती.