Sunil Raut : आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास, प्रवीण राऊतांशी जोडण्याचा चुकीचा प्रयत्न : सुनील राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने (ED) संजय राऊत यांना 31 जुलै रोजी अटक केली होती. त्यानंतर पीएमएलए कोर्टात हजर केलं असता त्यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. आज (4 ऑगस्ट) ही कोठडी संपल्याने राऊत यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं. अखेर कोर्टाने त्यांची कोठडी वाढवली. संजय राऊत चौकशीत सहकार्य करत नाहीत, असा आरोप ईडीने कोर्टात केला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola