Sunetra Pawar on Maharashtra DCM : उपमुख्यमंत्रिपदाची सूत्र हाती घेण्यास सुनेत्रा पवारांचा होकार

Continues below advertisement

Sunetra Pawar on Maharashtra DCM : उपमुख्यमंत्रिपदाची सूत्र हाती घेण्यास सुनेत्रा पवारांचा होकार

मुंबई : अजितदादांच्या पश्चात राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कुणाला मिळणार याचं उत्तर आता मिळालं आहे. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास तयार झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची शनिवारी दुपारी बैठक होणार असून त्यामध्ये सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे. डिझाईन बॉक्सचे प्रमुख नरेश अरोरा हे सुनेत्रा पवार यांचा निरोप घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मोठी पोकळी झाल्याची भावना निर्माण झाली होती. त्यातून बाहेर येण्यासाठी उपमुख्यमंत्रिपद सुनित्रा पवार यांनी स्वीकारावं अशी मागणी करण्यात येत होती. तसेच राष्ट्रवादीचे प्रमुखपदही त्यांच्याकडेच राहावं यासाठी अनेकजण प्रयत्नशील होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola