Sudhir Mungantiwar : चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार उमेदवारी अर्ज सादर करणार : ABP Majha
Continues below advertisement
लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे दोन दिवस उरलेत. राज्याचे वनमंत्री आणि चंद्रपूर लोकसभेचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार आज आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणार आहेत. अर्ज दाखल करताना मुनगंटीवारांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य दिग्गज नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या भित्तीशिल्पाला सुधीर मुनगंटीवार अभिवादन करतील.. त्यानंतर गांधी चौकात छोटेखानी सभेचं आयोजन करण्यात आलंय. गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढत मुनगंटीवार उमेदवारी अर्ज दाखल करतील
Continues below advertisement