Sri Lanka : सोन्याच्या श्रीलंकेला दारिद्र्याचं ग्रहण, जनता महागाईनं त्रस्त
Continues below advertisement
सोन्याच्या श्रीलंकेला दारिद्र्याचं ग्रहण, जनता महागाईनं त्रस्त. कधीकाळी सोन्याची लंका अशी बिरुदावली मिरवणारी श्रीलंका आता स्वतःच लंकेची पार्वती होण्याची वेळ आलेय. आर्थिक आणीबाणीमुळे श्रीलंकेत अस्थिरता, अराजक माजलंय. श्रीलंकेवर सध्या अब्जावधींचं कर्ज आहे आणि त्याची परतफेड करण्यासाठीही पैसे नाहीयेत. दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत त्यामुळे महागाईनं त्रस्त जनता रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शनं करत आहेत.
Continues below advertisement