Abhijeet Patil Solapur : माढा, सोलापुरात मविआला धक्का, अभिजीत पाटलांचा भाजपला पाठिंबा : ABP Majha
माढ्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी कारखाना सभासद, पदाधिकारी आणि विठ्ठल परिवाराच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत माढा आणि सोलापूर लोकसभेसाठी भाजपाला पाठिंबा जाहीर केला.
रात्री उशिरा झालेल्या या मेळाव्यात माढा लोकसभेचे भाजप उमेदवार खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी हजेरी लावली होती . यावेळी सर्व सभासद आणि कार्यकर्त्यांनी अभिजित पाटलांंच्या भूमिकेला एकमताने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान चार दिवसांपूर्वी अभिजित पाटलांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर शिखर बँकेने पूर्वीच्या ४४२ कोटी रुपये कर्जासाठी जप्तीची कारवाई केली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अभिजीत पाटलांना दिलासा देण्याचं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.