Shivsena MLA Disqualification : 10 महिन्यांपासून सुरु असलेल्या सुनावणीनंतर 500 पानी निकाल पत्र
Continues below advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा कलाटणी देण्याची क्षमता असलेला... शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा निर्णय आज दुपारी चार वाजल्यानंतर येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या निकालातील केवळ ठळक मुद्दे वाचतील. या सुनावणीच्या सविस्तर निकालाची प्रत दोन्ही गटांना नंतर दिली जाणार आहे. साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या सुनावणीचा निर्णय येणार असल्यानं सगळीकडे चर्चांना उधाण आलं आहे. याचं कारण म्हणजे मुख्यमंंत्री एकनाथ शिंदेच अपात्र ठरले तर राज्याला नवा मुख्यमंत्री मिळेल आणि शिंदेंना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल. पण ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरले तर तो उद्धव ठाकरेंना अतिशय मोठा दणका असेल. कारण ठाकरे गटाकडे आधीच केवळ १६ आमदार शिल्लक आहेत, त्यातील १४ अपात्र ठरले तर त्याचा थेट परिणाम लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर होऊ शकतो.
Continues below advertisement