Shivsena Dasara Melawa :दसरा मेळाव्याचं मैदान मारण्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार तयारी

गेले काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून रणकंदन माजल्यानंतर अखेरीस ठाकरे आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचं मैदान ठरलंय... मात्र दसरा मेळाव्याचं मैदान मारण्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे. आज दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी शिंदे गटाची बैठक होतेय मात्र एकीकडे मेळाव्यासाठी हजारो कार्यकर्ते आणण्याचं प्लॅनिंग शिंदे गटाकडून सुरू असताना तिकडे बीकेसी मैदानावर सभा घेण्यासाठी लागणारं अलॉटमेंट लेटर अजूनही शिंदे गटाला मिळालेलं नाही अशी माहिती आहे... त्यामुळे शिवसेनेतून सीमोल्लंघन केल्यानंतर होणारं शिंदेंचं हे शक्तीप्रदर्शन नेमकं कसं असेल याची उत्सुकता राज्याला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola