BJP Core Meet | शिवसेना-भाजपमधील कोंडी आज फुटेल का? मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक | ABP Majha

Continues below advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिनिधी म्हणून उद्या चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार  राज्यपालांची भेट घेणार आहेत. अवकाळी पावसाच्या नुकसानाचा आढावा घेण्याच्या निमित्तानं आज पहिल्यांदा शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी समोरासमोर बसून चर्चा केली. या बैठकीनंतर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. 

भाजपनं चर्चेसाठी दिलेल्या आमंत्रणावर शिवसेनेनं अजून सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. तरी नाराजी दूर करण्यात आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास मुनगंटीवारांनी व्यक्त केला. आता भाजप नेते उद्या राजपालांकडे नेमका कोणता प्रस्ताव घेऊन जाणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान 31 डिसेंबरपर्यंत भाजपात प्रदेशाध्यक्षासह अनेक संघटनात्मक बदल होणार असल्याची माहिती भाजप नेत्यांनी दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram