Shivraj Patil clarifies On jihad : जिहादवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवराज पाटील याचं स्पष्टीकरण : ABP Majha
Continues below advertisement
देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी दिल्लीतील कार्यक्रमादरम्यान केलेल्या विधानामुळे राजकीय वादाची शक्यता निर्माण झालीय. शिवराज पाटील यांनी गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या उपदेशांची तुलना जिहादशी केलीय.. फक्त कुराण आणि बायबलमध्ये जिहाद नसून श्रीकृष्णही अर्जुनाला जिहाद सांगायचे असं विधान शिवराज पाटील यांनी केलंय..त्यांच्या या विधानाने भाजपने शिवराज पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय... दिल्लीत मोहसिना किदवई यांच्या 'माय लाईफ इन इंडियन पॉलिटिक्स' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शिवराज पाटील यांनी हे विधान केलंय.
Continues below advertisement