Shiv Sena vs Shinde SC : आज सुप्रीम कोर्टात शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या अस्तित्वाची सुनावणी सुरु
आज सुप्रीम कोर्टात शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या अस्तित्वाची सुनावणी सुरु आहे. धनुष्यबाण कुणाचा हे या सुनावणीतुन स्पष्ट होणार आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आज ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तीवाद केला जातोय. या सुनावणीनंतर घटनापीठ पक्ष चिन्हाच्या निर्णयाबाबत निर्देश देण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेतील ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या संघर्षात आज कोर्ट काय निर्देश देतं याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.