Shiv Sena Symbol EC Hearing : कागदपत्रांची सत्यता तपासण्यासाठी ओळखपरेड करा : ठाकरे गट
abp majha web team
Updated at:
17 Jan 2023 06:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Shiv Sena Symbol: शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाकडे जाणार याचा निर्णय आजही लागला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुरू असलेली ही सुनावणी आता शुक्रवारी, 20 जानेवारीला होणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदे गटाची यावर केंद्रीय निवडणूक आयोगात आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. या सुनावणीच्या वेळी ठाकरे गटाकडून अनिल परब आणि सुभाष देसाई हे उपस्थित होते.