Shiv Sena on Mamata Banerjee :ममता यांचं राजकारण सध्याच्या 'फॅसिस्ट' राज्य प्रवृत्तीस बळ देण्यासारखं
Continues below advertisement
आता बातमी भाजपविरोधी एकजूट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांमधील वादाची. या वादात आज शिवसेनेनं ममता बॅनर्जी यांच्यावरच निशाणा साधत दे धक्का दिलाय.. शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचं राजकारण सध्याच्या फॅसिस्ट राज्य प्रवृत्तीस बळ देण्यासारखं असल्याची टीका शिवसेनेनं सामनामधून केलीय. काँग्रेसशिवाय राष्ट्रीय राजकारणापासून दूर ठेवू शकत नसल्याचं सांगत यूपीएचं कौतुकही सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलंय. तसंच यूपीएच्या नेतृत्वाचा मुद्दा आगामी काळात सुटेल, मात्र आधी पर्याय उभा करा असा सल्ला शिवसेनेनं दिलाय.
Continues below advertisement