Sanjay Raut Admitted | शिवसेना खासदार संजय राऊत लिलावती रुग्णालयात दाखल | ABP Majha
Continues below advertisement
शिवसेना खासदार संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छातीत दुखत असल्यामुळे संजय राऊत रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे. राऊत यांच्या एन्जिओग्राफी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लिलावतीमधील ज्येष्ठ हृदयतज्ज्ञांच्या देखरेखीखाली राऊत यांच्यावर पुढील दोन दिवस उपचार होणार आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. संजय राऊत यांच्यासाठी लिलावती रुग्णालयाच्या अकराव्या मजला रिझर्व्ह ठेवण्यात आला आहे. दरम्यान काळजी करण्यासारखं कारण नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
Continues below advertisement