Sanjay Raut | महाविकासआघाडीचं सरकार पाच वर्ष पूर्ण करेल; पुढील निवडणुकाही आम्ही एकत्र लढणार : संजय राऊत

Continues below advertisement
 देशासह राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच देशातील सर्वाधित कोरोना बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. अशातच राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव, तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे लोकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. राज्य सरकारमध्ये मात्र वेगळीच खलबतं चालली असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन चार दिवसात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. यादरम्यान ठाकरे सरकारच्या स्थिरतेबाबत चर्चांना उधाण आलं आहे. यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बातचित केली. त्यावेळी ते बोलताना म्हणाले की, 'महाराष्ट्राचं सरकार, ठाकरे सरकार... राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि इतर प्रमुख पक्ष यांच्या महाविकास आघाडीचं बनलं आहे. हे सरकार संपूर्ण 5 वर्षांचा कालखंड पार पाडणार असून पुढिल निवडणुकाही आम्ही एकत्रच लढणार आहोत.' असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram