स्थानिक निर्णयांमध्ये शिवसेनेला विश्वासात घेत नाही,सांगली शिवसेनाप्रमुखांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
Continues below advertisement
सांगली जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सांगलीचे पालकमंत्री, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची केली तक्रार केली आहे. सांगली जिल्ह्यात शिवसेना पक्षाला आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान दिलं जातं, तसंच जिल्ह्यातील शिवसेनेचा एकमेव आमदार असून त्याचे देखील खच्चीकरणं करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे नांदेड जिल्हाप्रमुखांनीसुद्धा अशोक चव्हाण यांच्याविरोधात तक्रार केली आहे.
Continues below advertisement