कुडाळमध्ये Shiv Sena-BJP चे कार्यकर्ते आमनेसामने, तर विनायक राऊतांच्या घरावर अज्ञाताकडून हल्ला
Continues below advertisement
राणेंना अटक झाल्यानंतर कोकणातलं राजकीय वातावरण तापलंय.. कुडाळमध्ये शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. तर शिवसेना खासदार विनायक राऊतांच्या घरावर अज्ञाताकडून हल्ला करण्यात आला. कुडाळमधील शिवसेना शाखेसमोर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानं बाचाबाची झाली. तर सिंधुदुर्गमधील तळगावात विनायक राऊतांच्या घरावर काचेच्या बाटल्या फेकल्या. रस्त्यावरून या बाटल्या रात्रीच्या अंधारात फेकल्याने या बाटल्या कोणी फेकल्या याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, मात्र राणेंना अटक केल्यानंतर राणे समर्थकांनी या बाटल्या फेकल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. विनायक राऊत यांच्या घरावर पोलिसांचा बंदोबस्त असतानाही बाटल्या फेकल्या. आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त विनायक राऊत यांच्या घराबाहेर तैनात केलाय.
Continues below advertisement