Karsevak : 1992 रोजी अयोध्येतल्या राममंदिर आंदोलनात सहभागी झालेल्या शिवसैनिकांचा सत्कार होणार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाचा मान राखून सहा डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतल्या राममंदिर आंदोलनात सहभागी झालेल्या शिवसैनिकांच्या बैठकीचं शिवसेना भवनात आयोजन करण्यात आलं होतं. अयोध्येतल्या राममंदिरात २२ जानेवारीला रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या वतीनं नाशिकच्या काळाराम मंदिरात २२ आणि २३ जानेवारीला खास सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. १९९२ साली कारसेवेसाठी जाणाऱ्या शिवसैनिकांना ठाकरे गटाच्या वतीनं नाशिकच्या सोहळ्यासाठी नेण्यात येणार आहे. या कारसेवक शिवसैनिकांचं सध्याचं वय लक्षात घेऊन त्यांना नाशिकमध्ये येण्याविषयी विचारणा करण्यात आली. या कारसेवक शिवसैनिकाचा नाशिकमध्ये सत्कार करण्यात येणार आहे. आजच्या बैठकीत कारसेवक शिवसैनिकांची माहिती एका फॉर्ममध्ये भरुन घेण्यात आली. कारसेवक शिवसैनिकांकडे १९९२ सालच्या राममंदिर आंदोलनातील फोटो, पेपरची कात्रणं, लेखी माहिती किंवा आठवणी असतील तर त्या जमा करण्याची विनंती करण्यात आली.