Shirdi Airport Raj Thackeray Arrival : राज ठाकरे शिर्डी विमानतळावर दाखल, मनसैनिकांची गर्दी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवसाच्या शिर्डी आणि नाशिक दौऱ्यावर आहेत... राज ठाकरे शिर्डीच्या साई मंदिरात पोहोचलेत... राज यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही आहेत.. राज ठाकरे सपत्नीक शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेणार आहेत.. यानंतर ते शिर्डीतील मनसैनिकांशी संवाद साधतील.. शिर्डीचा दौरा आटोपून राज ठाकरे ओझर विमानतळावरुन नाशिककडे रवाना होतील. नाशिकमध्येही ते पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत..