Shinde गटाच्या दसरा मेळाव्यात भाजप,MNS नेत्यांना निमंत्रण नाही 'एकनाथ' लोकनाथ संकल्पनेवर मेळावा

दसरा मेळावा म्हणजे शिवसेना हे आजवरचं समीकरण होतं.. मात्र शिवसेनेत  फुट पडल्यानंतर यंदा दसऱ्याला ठाकरे गट आणि शिंदे गटाचे दोन वेगवेगळे मेळावे होताहेत.. शिंदे गटाच्या मेळाव्याला भाजप नेते आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हजेरी लावणार का याची कुजबुज गेल्या काही दिवसांत ऐकायला मिळत होती. मात्र शिंदे गटातल्या नेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर इतर कोणत्याही पक्षांच्या नेत्यांचा निमंत्रित करण्यात आलेलं नाही. शिंदे गट म्हणजेच शिवसेना हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न दसरा मेळाव्याच्या निमित्तानं होणार आहे...  सत्तांतरानंतर शिंदे हे दसरा मेळाव्याच्या निमित्तानं पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या गर्दीला संबोधित करणार आहेत. त्यामुळे व्यासपीठावर  इतर कोणत्याही नेत्याला स्थान न दिलेलं बरं असा विचार शिंदे गटानं केलेला दिसतोय..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola