Shatrughna Kate Chinchwad : चिंचवडमध्ये शत्रुघ्न काटे बंडखोरी करण्याच्या तयारीत?

Continues below advertisement

पिंपरी चिंचवड चिंचवड विधानसभेची (Chinchwad Vidhan Sabha Election)  उमेदवारीवरून विद्यमान आमदार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) आणि शहराध्यक्ष शंकर जगताप (Shankar Jagtap) या दीर-भावजयांमध्ये लक्ष्मण जगतापांचा खरा उत्तराधिकारी कोण? यावरून वादविवाद सुरू असताना यामध्ये आणखी एका नावाची पडली आहे. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांचे एकेकाळचे कट्टर समर्थक शत्रुघ्न काटेंनी (Shatrughna Kate ) निवडणूक लढवण्याची इच्छा  व्यक्त केली आहे. एवढच नव्हे कर शत्रुघ्न काटे बंडखोरीच्या तयारीत असल्याचे देखील  बोलून दाखवलं आहे. 
  
भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap)  यांच्या पत्नी आमदार अश्विनी जगताप (Ashwini jagtap) यांच्या मतदारसंघावर दीर  पिंपरी- चिंचवड (Pimpri- Chinchwad)   भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप (Shankar Jagtap)  यांनी दावा ठोकलाय.  मीच खरा उत्तराधिकारी म्हणत  शत्रुघ्न काटेंनी या वादात उडी घेतली आहे. भाजप परिवारवाद टाळेल आणि मला उमेदवारी देईल. मात्र असं घडलं नाही तरी माझं निवडणूक लढायचं ठरलं आहे. अशावेळी अश्विनी जगताप की शंकर जगतापांविरोधात लढायला आवडेल, ते पक्ष ठरवेल. मी निवडणूक लढण्यावर ठाम आहे,  असं म्हणत शत्रुघ्न काटेंनी बंडखोरीच्या तयारीत असल्याचं बोलून दाखवलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram