Sharad Pawar : BJP हळूहळू आपल्या मित्रपक्षाला संपवतो, शरद पवारांचा हल्लोबोल ABP Majha

Continues below advertisement

Sharad Pawar on BJP : "भाजप मित्रपक्षाला हळूहळू संपवतो," असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला. महाराष्ट्रातील शिवसेना (Shiv Sena) आणि बिहारमधील जेडीयूकडे (JDU) बोट दाखवत शरद पवार यांनी हल्लाबोल केला. शरद पवार यांच्या या वक्तव्याला भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी (Sushil Kumar Modi) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda) यांच्या वक्तव्यांची पार्श्वभूमी आहे.

शरद पवारांचा भाजपवर निशाणा
भाजपच्या अध्यक्षांनी असं वक्तव्य केलं की प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही, ते शिल्लक राहणार नाहीत आणि आमचा एकच भाजप हा पक्ष देशामध्ये शिल्लक राहिल. नितीश कुमारांची तक्रार आहे तीच अकाली दलाची आणि इतर मित्र पक्षांची आहे. भाजप त्यांच्यासोबत असलेल्या मित्रपक्षाला हळूहळू संपवतो. शिवसेना-भाजप एकत्र होते. शिवसेनेत फूट कशी पाडता येईल, अशी परिस्थिती निर्माण केली आणि मित्रपक्षाने शिवसेनेवर आघात केला. नितीशकुमार हे लोकांची मान्यता असलेला नेताच आहे. निवडणुकीत भाजप एकत्र येते आणि मित्र पक्षाच्या जागा कशा कमी येतील याची काळजी घेते. नितीशकुमार वेळीच सावध झाले. त्यांनी तातडीने राजीनामा दिला. आज भाजपचे नेते त्यांच्यावर टीकाटिप्पणी करतात आहेत. परंतु नितीश कुमार यांनी टाकलेलं पाऊल शहाणपणाचं आहे, असं शरद पवार म्हणाले.  

सुशील कुमार मोदी काय म्हणाले होते?
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी भाजपवर अनेक आरोप करत एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या गोष्टीचा धागा पकडत सुशील मोदी यांनी महाराष्ट्र आणि शिवसेनेचं उदाहरण दिलं. त्यांनी म्हटलं होतं की, "आम्ही कोणताही मित्रपक्ष तोडत नाही. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांना आम्ही तोडले आहे. जसे महाराष्ट्र. महाराष्ट्रात शिवसेनेने आमचा विश्वासघात केला आणि त्याचे परिणाम भोगावे लागले."

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram