Tilak award for Prime Minister सोहळ्यात Sharad Pawar यांनी जाऊ नये,कॉंग्रेस, ठाकरे गट करणार विनंती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्या पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यासाठी शरद पवार आज पुण्यात दाखल होणार आहेत. पण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा पवार गट आणि ठाकरे गटाचाच मोदींना पुरस्कार देण्याला विरोध आहे. या विरोधाचं नेतृत्व बाबा आढाव करणार आहेत. या पुरस्कार वितरण सोहळ्यात शरद पवारांनी सहभागी होऊ नये अशी विनंती पवारांना करण्यात येणार आहे. त्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते आज पवारांना भेटणार आहेत. काँग्रेसचे मोहन जोशी, राष्ट्रवादीकडून शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचासह अनेक नेते शरद पवारांची त्यांच्या मोदीबागमधील निवासस्थानी भेट घेणार आहेत.