Chandrashekhar Bawankule On Voting :मतदान रात्रीपर्यंत होतं, चंद्रशेखर बावनकुळेंचा खुलासा :ABP Majha
मतदानाची टक्केवारी जाहीर करण्याच्या वेळेवरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये नवा वाद सुरू झालाय. निवडणूक आयोगाकडून रात्री उशिरा मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात येते.ही तक्रार असल्याचं शरद पवारांनी सांगितलंय. तर मतदान अचानक कसं वाढलं आणि हे जाहीर करण्यासाठी इतका वेळ का लागतो असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय..तर यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बानवकुलेंनी प्रत्युत्तर दिलंय. मोदींच्या नावाची लाट आहे त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मतदान होतं असून टक्केवारी समोर येतं असल्याचं बानवकुळेंनी सांगितलंय. त्यामुळे बानकुळेंच्या या उत्तरानंतर आता पुन्हा नव्यानं वाद होण्याची शक्यता आहे..