Sharad Pawar यांचे नातू आणि आमदार Rohit Pawar यांच्या अडचणीत आणखी वाढ ? : ABP Majha
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे... रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर या कंपनीच्या प्राथमिक चौकशीला ईडीकडून सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... २००६ ते २०१२ पर्यंत रोहित पवार हे या कंपनीचे संचालक होते... तसेच रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार हे देखील २००६ ते २००९ पर्यंत या ग्रीन एकर कंपनीचे संचालक होते... त्याचबरोबर या कंपनीत असणारे इतर सर्व सदस्य हे सध्या तुरुंगात असलेल्या एचडीआयएल कंपनीचे मालक राकेश वाधवान यांच्यासोबत इतर कंपन्यांमध्ये पार्टनर देखील आहेत... आणि याचदृष्टीनं ईडीचा तपास सुरु आहे... अशी माहिती सूत्रांनी दिलीय..
Continues below advertisement