Mumbai : मुंबईत शरद पवार भाजपविरोधी नेत्यांची बैठक आयोजित करण्याची शक्यता
Continues below advertisement
एकीकडे शरद पवार यांना यूपीएचं अध्यक्षपद द्यावं असा ठराव राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं केला असताना पवार मुंबईत बिगर भाजप मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित करण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिगर भाजपशासित मुख्यमंत्र्यांना एकत्र येण्यासाठी पत्र लिहून आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी नेत्यांची बैठक शरद पवार मुंबईत आयोजित करू शकतात असं सूत्रांकडून कळतंय.
Continues below advertisement