NCP Crisis : पक्ष विस्तारात अजित पवारांचा कुठलाही हातभार नाही : शरद पवार गट: ABP Majha
राष्ट्रवादी निवडणूक चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगात सुनावणी झाली. शरद पवार गटाचे वकील देवदत्त कामत यांनी आज युक्तिवाद केला. आता उर्वरित युक्तिवाद बुधवारी २९ नोव्हेंबरला होणार आहे. १९९८ ते २०१८ या २० वर्षात शरद पवारांच्या नावाने पक्ष काढला, एवढ्या निवडणुका झाल्या, मात्र कधी आक्षेप घेतला गेला नाही. अचानक २०२३ मध्ये २०१८ च्या पक्षांतर्गत निवडणूक प्रकियेबाबत आक्षेप कसा असा सवाल शरद पवार गटाने उपस्थित केलाय. तर या खटल्याचं मेरिट लक्षात आल्यामुळे शरद पवार गट सातत्याने तेच तेच युक्तिवाद करतोय असा टोला अजित पवार गटाने लगावला.