Sharad Pawar VS Ajit Pawar : अजित पवार गटाच्या आमदारांविरोधात शरद पवार गट आक्रमक : ABP Majha

एकीकडे अजित पवार गटाच्या विधानसभेतील आमदारांचा अपात्रे बाबत विधानसभा अध्यक्षांकडे कारवाई सुरू असताना, आता विधान परिषद आमदारांच्या कारवाईसाठी देखील अर्ज दाखल केले जाऊ लागलेत. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडे आमदार अपात्र करण्यासाठी 2 अर्ज दाखल करण्यात आलेत. एक अर्ज प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांच्या नावे तर दुसरा अर्ज शरद पवार गटाचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या नावे करण्यात आलाय. जयंत पाटील यांनी केलेल्या अर्जात आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण, अमोल मिटकरी आणि अनिकेत तटकरे यांच्या नावाचा उल्लेख तर जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या अर्जात रामराजे यांच्या नावाचा उल्लेख आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola