Sharad Pawar Full Speech: माझ्या पूर्वजांनी सातारा जिल्ह्यात शेती केलीय, त्यामुळे मी पण सातारकर
सातारा आणि सातारा जिल्ह्याचा इतिहास सांगायला अनेक काळ लागेल, महाराष्ट्र राजयसाठी सताऱ्याने अनेक त्याग केले, महाराष्ट्र आणि देशाचा स्वतंत्र लढा झाला आणि यात अनेक लोक सातारा जिल्ह्यातील होते याची फार मोठी जागा सतारकारांनी घेतली. सातारा जिल्ह्याने अनेक आधीकारी, अनेक लोकप्रतिनिधी दिले. मुंबईत राज्याचे पाहिले मुख्यमंत्री देखील सातारा जिल्हयाचे होते. इंग्रजांच्या काळात सातारकरांनी त्यांना विरोधाची भूमिका दाखवली.माझ्या पूर्वजांनी सातारा जिल्ह्यात शेती केली त्यामुळें केवळ तुम्ही नाही तर मी पण सातारकर आहे
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावर सध्या राजकारण तापले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची अहमदनगर (Ahmednagar) येथे भेट घेतली. वीस मिनिटांच्या चर्चेअंती शरद पवार यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला आरक्षणाबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीआधी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन शरद पवारांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) जे निर्णय घेतील त्यांना आम्ही पाठिंबा देऊ, असा शब्दही शरद पवारांनी मराठा शिष्टमंडळाला दिला आहे. आरक्षणात राजकारण आणले जाणार नाही, असे स्पष्टीकरण देखील त्यांनी यावेळी दिले आहे.