Sharad Pawar : केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर मोठे वक्तव्य केले आहे. घटनेत बदल करण्याची भूमिका घेतल्यास आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. तमिळनाडूतून ७२ टक्के आरक्षण मिळू शकते, तर घटनेत बदल करता येऊ शकतो, असेही पवार यांनी नमूद केले. केंद्राच्या पातळीवर धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. 'प्रगतीच्या रस्त्यावर जायचं असेल तर त्याला आरक्षणाच्या मार्गानेच जावं लागेल' असा विचार त्यांनी मांडला. आरक्षणाची आवश्यकता आहे, हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. केंद्र सरकारने यावर निर्णय घ्यावा लागेल. ५८ टक्के किंवा ६२ टक्के आरक्षण देण्यासाठी, तसेच देशाच्या प्रगतीच्या दृष्टीकोनातूनही हा आरक्षणाचा निर्णय महत्त्वाचा आहे. सर्वांशी संबंधित हा निकाल संसदेमध्ये घेतला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola