Shantigiri Maharaj Statment : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा, शांतिगिरी महाराजांचा दावा

Continues below advertisement

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनाचा आम्हाला पाठिंबा असल्याचं मोठं वक्तव्य शांतिगिरी महाराजांनी केलं आहे. शांतिगिरी महाराज यांनी नाशिक लोकसभेसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.  

शांतीगिरी महाराजांकडून (Shantigiri Maharaj) नाशिकमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे. शांतीगिरी महाराज प्रचारासाठी दररोज नवनवीन फंडे शोधत आहे. आज प्रचाराचा अखेरचा दिवस असून शांतिगिरी महाराजांनी आज भव्य प्रचार रॅली काढली आहे. यावेळी त्यांनी एबीपी माझाशी बोलताना मोठा दावा केला.    

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्याकडून शक्ती प्रदर्शन केले आहे. नाशिकच्या गंगा घाटावरून शांतीगिरी महाराजांच्या रॅलीला सुरुवात झाली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार रॅली आयोजित करण्यात आली आहे. शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारीने नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram