SC Hearing On Maharashtra :सुप्रीम कोर्टाच्या निकालात नेमकं काय? सेनेच्या दोन्ही गटांवर काय परिणाम?

Continues below advertisement

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासाठी आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. अवघ्या काही मिनिटात या प्रकरणात सुनावणीला सुरुवात होणार आहे... आणि  सुप्रीम कोर्ट या प्रकरणात निर्णय देणार आहे... महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत 2016 च्या नबाम रेबिया प्रकरणाच्या पुनर्विचाराची गरज वाटली तर हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या पीठाकडे जाईल.. जर कोर्टाने या निकालाच्या पुनर्विचाराची गरज नाही असं म्हटलं तर ही सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे सुरू राहील.. अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस प्रलंबित असेल तर ते आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय करू शकत नाहीत असा 2016 चा नबाम रेबिया प्रकरणाचा निकाल आहे.. त्याच आधारावर महाराष्ट्रात जूनमध्ये जेव्हा सत्तांतराचं नाट्य घडत होतं, त्यावेळी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली गेलेली होती... त्यामुळे त्यांना आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार नाही, असा शिंदे गटाचा दावा आहे... गेले तीन दिवस सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर याबाबत दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाले आहेत. त्यानंतर आता आज काय निर्णय येतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram