Sanjay Raut v/s Bawankule On Senate : अजून किती निवडणुकांना स्थगिती द्याल? राऊतांचा सवाल
abp majha web team
Updated at:
18 Aug 2023 08:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीला स्थगित दिल्याने राजकीय पक्ष त्यासोबतच विद्यार्थी संघटना नाराज झाल्यात. ९ ऑगस्ट रोजी सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला होता. १० सप्टेंबरला निवडणूक आणि १३ सप्टेंबरला निकाल, असा हा कार्यक्रम होता. पण व्यवस्थापन परिषदेच्या कालच्या बैठकीत निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित झालाय, एवढं नक्की. यावरून आता विरोधकांनी टिकेची झोड उठवलीय. ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी काय कारण दिलंय