Savarkar I सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही; राऊतांचा काँग्रेसला इशारा I एबीपी माझा

स्वातंत्र्यवीर सावकरांवरुन काँग्रेस आणि शिवसेना आमनेसामने आल्याचं पाहायला मिळतंय. कारण, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सावरकरांवरुन केलेल्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे दैवत आहेत. इथं तडजोड होणार नसल्याचं ट्विट संजय राऊत यांनी केलंय. रेप इन इंडिया या वक्तव्यावर राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात येतेय. त्यावर राहुल गांधींनी आपण राहुल सावरकर नाही तर राहुल गांधी आहोत. त्यामुळं माफी मागणार नाही असं वक्तव्य केलं होतं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola