Sanjay Raut SC Thackery Group : ठाकरे गटाच्या दोन्ही याचिकांवर आजपासून 'सर्वोच्च' सुनावणी
Continues below advertisement
शिवसेना आणि ठाकरे गट यांच्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण आज सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाने दोन याचिका सु्प्रीम कोर्टात दाखल केल्या होत्या. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं असल्याचा निकाल दिला होता. या निकालाविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणाराय. तर तर १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी तातडीने सुनावणी घ्यावी, यासाठी ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. त्यावरही सुनावणी होणाराय.
Continues below advertisement