Sanjay Raut : औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणाऱ्यांसोबत हातमिळवणी कदापीही शक्य नाही : संजय राऊत शिवसेना
औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणाऱ्यांसोबत हातमिळवणी कदापीही शक्य नाही, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एमआयएमची ऑफर धुडकावलीय. एमआयएमचे खासदार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र विकास आघाडीशी हातमिळवणी करण्याचा प्रस्ताव आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या माध्यमातून दिला होता. भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं म्हणत जलील यांनी कट्टर हिंदुत्त्वाचा पुरस्कार करणाऱ्या.