Sanjay Raut PC | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल 12 डिसेंबरलाच कळेल : संजय राऊत | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Dec 2019 01:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पंकजा मुंडेच काय, तर राज्यातील अनेक बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवाय, पंकजा मुंडेंबाबत 12 डिसेंबरलाच कळेल, असंही राऊतांनी स्पष्ट केलं आहे. पंकजा मुंडे यांच्या कालच्या फेसबुक पोस्ट आणि आज ट्विटर हॅण्डलवर भाजपचा उल्लेख नसल्याने, त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊतांनी हा गौप्यस्फोट केला आहे.