Sanjay Raut Full PC : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारांनी राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली

Sanjay Raut on Devendra Fadnavis : महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत, तोपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांतता लाभणार नाही, असं मोठं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. राज्यात सत्तांतर घडवावं लागेल असेही राऊत म्हणाले. तसेच सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांवर ताबडतोब खटले दाखल करावे असेही राऊत म्हणाले. काही मराठा आंदोलकांनी मातोश्रीवर जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, याबाबत राऊतांना प्रश्न विचारला होता. यावर बोलताना राऊत म्हणाले की,  ही सगळी भाजपची कारस्थानं आहेत.

मनोज जरांगे पाटील हे एक स्वतंत्र विचारांचे गृहस्थ, त्यांना निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार

मनोज जरांगे पाटील हे एक स्वतंत्र विचारांचे गृहस्थ आहेत. ते अजून राजकारणात आले नाहीत. ते त्यांच्या समाजासाठी संघर्ष करत आहेत. त्यांचे प्रश्न आम्हालाही माहित आहेत असे राऊत म्हणाले. या देशात लोकशाही आहे कोणीही निवडणूक लढवू शकतो. म्हणून जरांगे पाटील यांनी काही भूमिका घ्यायची असेल तर ते घेऊ शकतात, भारतीय राज्यघटनेने त्यांना अधिकार दिल्याचे संजय राऊत म्हणाले.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola