Sanjay Raut On Jayant Patil : जयंत पाटलांनी भाजपची गुलामगिरी नाकारली : संजय राऊत : ABP Majha
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीने नऊ तास चौकशी केली. यावरून आता दावे-प्रतिदावे केले जातायंत. जयंत पाटलांनी भाजपची गुलामगिरी नाकारली, असा दावा संजय राऊतांनी केलाय तर असा कुठला प्रस्ताव नव्हता असं भाजपनं म्हटलंय. त्यावर मी प्रस्ताव स्वीकारला असता तर महाविकास आघाडीचं सरकार पडलं असतं, असा दावा अनिल देशमुखांनी केलाय.