Sanjay Raut on ED Notice केंद्रीय संस्था हातात असल्यानं अशा कारवाया, दिल्लीत आमचेही दिवस येतील

ED ची नोटीस आल्यानं आमच्या चेहऱ्यावरचं हसू कमी होत नाही. केंद्रीय संस्था हातात असल्यानं अशा कारवाया, दिल्लीत आमचेही दिवस येतील अशी प्रतिक्रिया शिवसेना खा. Sanjay Raut यांनी दिली आहे.

शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केलीय का असा प्रश्न संजय राऊत यांच्या ट्वीटमुळे उपस्थित होत आहे. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात समन्स बजावल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अनिल परब यांना या प्रकरणी मंगळवाली ईडी चौकशीला हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola