Sanjay Raut on Eknath Shinde : भाजपला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नको होते, संजय राऊतांचा दावा
Continues below advertisement
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल मोठा दावा केला आहे. २०१९च्या आधी भाजपला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदी नको होते, खुद्द फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी तशी भूमिका माडंली होती, असं राऊत म्हणाले. एवढंच नाही तर ऑक्टोबर २०१९मध्ये महाविकास आघाडी बनत असताना अजित पवार, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटलांनी देखील शिंदेंना विरोध केला होता. शिंदे हे आम्हाला ज्युनिअर आहेत, आम्ही त्यांच्यासोबत काम करणार नाही अशी अजित पवारांची भूमिका होती, असं राऊत म्हणाले. मुंबईसह ठाणे आणि कल्याणमध्ये उद्या मतदान होतं आहे. ठाणे आणि कल्याण हे प्रामुख्यानं एकनाथ शिंदेंचं प्रभावक्षेत्र आहे. तिथं मतदानाच्या नेमकं एक दिवस आधी शिंदेंबद्दल असं वक्तव्य करणं, हे राऊतांनी ठरवून केलं का, अशी चर्चा सध्या सुरू झालीये.
Continues below advertisement