Sanjay Raut On ED : पुढील आठवड्यात ईडीचा सर्वात मोठा घोटाळा उघड करणार, संजय राऊत यांचा इशारा
abp majha web team
Updated at:
19 Feb 2022 04:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut On ED : पुढील आठवड्यात ईडीचा सर्वात मोठा घोटाळा उघड करणार असल्याचा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. संजय राऊत यांनी आज ट्वीट करून ईडी अधिकाऱ्याच्या बेनामी संपत्तीवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ईडी आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आरोपांचे बाण सोडले. भाजपने मुंबईतील केंद्रीय तपास यंत्रणांची कार्यालये खंडणीखोर केली असल्याची घणाघाती टीकाही राऊत यांनी केली.