Sanjay Raut On Devendra Fadnavis : मोर्चा नॅनो होता तर तुमचं सरकारही नॅनो बुद्धीचं : संजय राऊत

Sanjay Raut On Devendra Fadnavis : महाविकास आघाडीच्या मोर्चावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केलेल्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मधल्या काळात फडणवीस हे दिल्लीला गेले होते. त्यावेळी दिल्लीश्वरांनी त्यांना गुंगीचं औषध दिलेलं दिसतंय, असा टोलाही राऊतांनी लगावला. आमचा मोर्चा नॅनो होता तर तुमचं सरकारही नॅनो बुद्धीचं असल्याचे राऊत म्हणाले. फडणवीसांनी नॅनो शब्द वापरुन चूक केल्याचे राऊत म्हणाले.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola