Sanjay Raut meet Satyapal malik : संजय राऊत यांनी घेतली सत्यपाल मलिक यांची भेट

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची नवी दिल्लीत भेट घेतली... आणि त्यांना मुंबई दौऱ्याचं निमंत्रणही दिलं... आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला खूप महत्त्व प्राप्त झालंय..  २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्याबद्दल मलिक यांनी काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप केले होते... जवानांच्या वाहतुकीदरम्यान नियम पाळण्यात आले नाहीत, त्यांच्यासाठी विमानाची मागणी करूनही ती मान्य केली नाही, असा गंभीर आरोपही मलिक यांनी केला होता.... त्यामुळे ४० जवान शहीद झाले होते... मलिक यांच्या या वक्तव्यामुवळे मोठी खळबळ माजली होती..... या पार्श्वभूमीवर राऊतांच्या मलिक भेटीला महत्त्व आहे..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola