Sanjay Raut on PM Narendra Modi : कर्नाटकवरुन येताना बोम्मईंना सूचना देऊन या, राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut on PM Narendra Modi : कर्नाटकवरुन येताना बोम्मईंना सूचना देऊन या, राऊतांचा हल्लाबोल

पंतप्रधानांनी कर्नाटकातून येताना बेळगाव व इतर सीमा भागावरती अत्याचार महाराष्ट्रवर होत आहेत, त्यासाठी तिकडच्या मुख्यमंत्र्याना सूचना करून महाराष्ट्रात घोषणा करावी. यापुढे बेळगावमधील मराठी बांधवांवरती अत्याचार करू नका, अशा सूचना देऊन महाराष्ट्रात घोषणा करावी, त्या नंतर आम्हाला आनंद होईल. या अनेक प्रकल्पाची योजना, पायाभरणीची सुरुवात, अनेक अडथळे पार करून शिवसेनेची सत्ता असताना महानगरपालिकेने केलेली आहे,
आणि त्यातील प्रमुख कामांचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान येत आहेत हे शिवसेनेचे यश आहे. शिवसेनेने सुरू केलेला कामांना गती मिळाली, त्यामुळे भारतीय जनता पार्टी पक्षाला आज त्यांच्या प्रचाराचे भूमिपूजन करता येत आहे, हे प्रचाराचे भूमपूजन आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola