देशातल्या कोणत्याही संस्थांची तालिबानशी तुलना करणं चुकीचं : Sanjay Raut : ABP Majha

Continues below advertisement

अनिल देशमुखांना पहिल्यांदाच नोटीस आलेली नाही. या देशात अनेकांना लुकआऊट नोटीस मिळाली आहे. त्याबाबत मी बोलणार नाही. अनिल देशमुख कायदेशीर लढाई लढत आहेत. त्यामुळे याप्रकरणात वेट अॅण्ड वॉचची भूमिका घ्यायला हवी,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच “कोथळा काढायला हातात जे शस्त्र घ्यायला लागते ते पेलवण्यासाठी विश्वासघातक्यांच्या दंडात ताकद आहे का? आता भाजपा प्रामाणिक मित्रपक्षांसोबतच येणाऱ्या सर्व निवडणूका लढेल आणि जिंकेल!” असं चंद्रकांत पाटील यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच देशातल्या कोणत्याही संस्थांची तालिबानशी तुलना करणं चुकीचं आहे हे Sanjay Raut यांनी स्पष्ट केलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram